*⚡बांदा दि.१८-:* गणेशोत्सवाच्या अगोदर दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बांदा दशक्रोशीतील हळवी भातपिके तयार होत असून सुरू असलेल्या पावसाने लोंबामध्ये पळींज(पॉल) होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पिके जमिनदोस्त झाली आहेत.
पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास करपा रोगातून वाचलेली पिके वाया जाणार असल्याच्या चिंतेने बळीराजा हतबल झाला आहे.
