सचिन जोईल यांच्या वतीने कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात अगरबत्ती व मोदक प्रसादाचे वाटप

*⚡देवगड ता.१८-:* देवगड तालुक्यातील कातवण ग्रामपंचायत सदस्य सचिन जोईल यांच्या माध्यमातून गणेशोत्सवा निमित्ताने घरोघरी जाऊन अगरबत्ती तसेच मोदक प्रसादचे वाटप करण्यात आले आहे. सचिन जोईल यांच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी गणेश चतुर्थी निमित्ताने सचिन जोईल यांनी कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात गावोगावी जाऊन गणेश दर्शन घेऊन अगरबत्ती तसेच मोदक प्रसादचे वाटप केले आहे,सचिन जोईल यांच्या कार्याचे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी कौतुक केले आहे,

You cannot copy content of this page