*⚡वैभववाडी ता.१७-:* नावळे राणेवाडी येथील गोविंद धोंडू रामाणे (वय 48 )याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयत गोविंद रामाणे याला दारुचे व्यसन होते. तो मोलमजुरी करत होता. दारुच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी गेली सहा महीने मुंबईला राहत आहे. गावी तो एकटाच राहत होता. आज दुपारी घराशेजारील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती वैभववाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ, भावजय असा परिवार आहे.
नावळे राणेवाडी येथील इसमाने गळफास लावून घेत केली आत्महत्या
