मालवण नगरपालिकेत आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अशी अवस्था

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची टीका

*⚡मालवण ता.१७-:* मालवणच्या नगराध्यक्ष आणि प्रशासनाने शहरात गटार तसेच ओहोळ, नाले याठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून गणेश चतुर्थीपूर्वी गाळ काढण्याचे आदेश देऊनही कामे का नाही झाली. आदेश देऊनही प्रशासन त्यांना किंमत देत नसेल तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे, कचऱ्याची उचल नाही, स्ट्रीटलाईट बंद, अग्निशामक बंद, डास प्रतिबंधक फवारणी नाही, अधिकारी बदली होऊन गेले त्यांच्या जागी नवे अधिकारी नाही. शहरात कोणत्याही गोष्टीचे नियोजन नाही. त्यामुळे नगरपालिकेत आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अशी अवस्था झाली असून या सर्वाला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार असल्याची घणाघाती टीका मालवणचे उपनगराध्यक्ष श्री राजन वराडकर यांनी येथे केली. मालवण नगरपालिकेत उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे गटनेते नगरसेवक गणेश कुशे उपस्थित होते. यावेळी राजन वराडकर म्हणाले, मालवण शहरात कचऱ्याचे ढीग पसरले असून कचऱ्याच्या गाड्या नाहीत, माणसे नाहीत अशी उत्तरे स्वच्छता मुकादम देतात. माणसे पुरविण्याची जबाबदारी कोणाची ? ती पूर्ण करत नसेल तर कारवाई का होत नाही ? ऑर्डर पेक्षा माणसे कमी येत असतील तर ठेकेदारावर कारवाई करणे हे मुख्याधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र ठेकेदारांची बिले व्यवस्थित पूर्ण होतात. तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कचरा च्या नवीन पाच गाड्या घेतल्या त्या आज बंद पडल्या आहेत. गणपती उत्सव काळातही शहरात कचऱ्याचे नियोजन नाही. देऊळवाडा येथे गणेश विसर्जन ठिकाणी नगरपालिकेने गाळ काढून तिथेच टाकला. चतुर्थी पूर्वी मूर्ती विसर्जन स्थळाचा गाळ काढण्याची कामे का झाली नाही असा सवाल करून श्री वराडकर यांनी मालवण शहरात मूलभूत सुविधांबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या असून शहराची बिकट स्थिती निर्माण झाली असताना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे हे दोघेही न झालेल्या कामांची बिले काढण्यात मग्न असल्याचा आरोप केला हा आरोप करतानाच नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्यावर त्यांच्याच शिवसेना पक्षातील नेत्यांचा विश्वास राहिलेला नसून कामा अभावी नगराध्यक्षानी मालवण शहरातील शिवसेना संपवल्याची टीका टीका त्यांनी केली

You cannot copy content of this page