स्वच्छतेची शपथ घेत मालवण येथे राबवण्यात आले स्वच्छ्ता अभियान

मालवण दि प्रतिनिधी मालवण पंचायत समिती येथे दिवाणी न्यायाधीश यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेत शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारताच्या ७५ व्या स्वतंत्रदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र स्वच्छता अभियान, स्वच्छता उपक्रम राबवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वच्छतेबाबत विशेष अभियान राबवत असून विविध उपक्रमात स्वतःहून सहभागी होत आहेत. याच अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती मालवण यांनीही स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे व गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली. पंचायत समिती मालवणच्या वतीनेही शुक्रवारी पंचायत समिती परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सभापती अजिंक्य पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, पी. डी. जाधव, संजय गोसावी यासह अन्य कर्णाचारी सहभागी झाले होते. फोटो : मालवण पंचायत समिती येथे स्वच्छता अभियानात सहभागी सभापती अजिंक्य पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व अन्य.

You cannot copy content of this page