ज्युसच्या बाटलीवर रेखाटल आरवलीच्या प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाचे चित्र

शिरोडा येथील श्रीराम वारखंडकर यांची कलाकृती

*⚡वेंगुर्ले ता.१७-:* वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा खासबागवाडी येथील कलाकार श्रीराम वारखंडकर यांनी आपल्या कलेतून ज्युसच्या बाटलीवर सुंदर अशी आरवलीच्या प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाचे चित्र पेंटिंग मधून साकारले आहे. शिरोडा येथील श्रीराम वारखंडकर यांच्या चित्रांचे नेहमीच कौतुक होते. त्यांनी छोट्या तांदळा वर काढलेले चित्र असो, किव्हा शिंपल्याच्या आत काढलेली चित्र असो सर्वच चित्र पाहणाऱ्यांना भुरळ घालून जातात. आज अशाच प्रकारे त्यांनी ज्युस च्या उभ्या बाटलीवर सुंदर अशी वेतोबाची मूर्ती हुबेहूब रंगातून साकारली आहे. ते पाहून कलाकार वारखंडकर यांच्या कलेचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page