परशुराम उपरकर यांचे आवाहन;राणेंप्रमाणे इतर शिक्षण संस्थांना कर्ज जिल्हा बँक देणार का?
*⚡कणकवली ता.१७-:* जिल्हा बँक निवडणूक निमित्ताने शिवसेना व भाजपामधून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.मागच्या निवडणुकीत कॉग्रेसमध्ये ज्यांनी एकत्र प्रचार केला होता.तेच आता शिवसेना भाजपात असून प्रचारात उतरले आहेत.प्रचार करताना बँकेकडून वस्तू वाटल्या जात आहेत,तर काहीजण भेट वस्तू देत असूनआपण निवडणुकीला उभे राहणार असल्याचे सांगितले जात आहेत.राणेंच्या शिक्षण संस्थेला १४ कोटीचे कर्ज दिले,त्याप्रमाणे इतर शिक्षण संस्थांना कर्ज जिल्हा बँक देणार का? आता जिल्हा बँक लढवणारे पूर्वीचे कॉग्रेसचेच आहेत, फक्त पक्ष बदलले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची जिल्हा बँक लुटली जाईल,असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.बँकेच्या कल्याणासाठी राजकीय विरहित पॅनेल तयार करावे,मनसे पाठीशी राहील,असे परशुराम उपरकर यांनी सांगितले. कणकवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे १४ कोटी थकीत असल्याने आ.नितेश राणे यांच्या ठरावाला आक्षेप नोंदवण्यात आला असल्याचे समजते.आता जिल्हा बँकेवर असलेल्या संचालक मंडळाने ते कर्ज दिले आहे.भाईसाहेब सावंत पतसंस्थेला ७ कोटी कर्ज थकीत होवून २० कोटी झाले आहे.आमदार असताना सभागृहात बँकेबाबत प्रश्न उपस्थित करत होते. त्यावेळी राजन तेली बाजू उचलून धरत होते,असा टोला परशुराम उपरकर यांनी केला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून गोकुळ व प्रतिभा दूध आणण्यासाठी चेअरमन व सदस्यांचा पुढाकार होता.शासकीय डेअरी बंद पाडून टाकली.जिल्हा संघ चालू करण्यासाठी ५० लाखाचे कर्ज दिले.दूध संस्थेच्या माध्यमातून दूध संकलन केले,जवजवळ शेतकऱ्यांचे प्रतिभा दूध डेअरीने अडीज कोटी थकीत केले आहेत.गेल्या निवडणूकीत मार्च अखेर पर्यत शेतकऱ्यांना पैसे देतो असे नितेश राणे यांनी सांगितले होते,त्याचे काय झाले?असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला. सध्या प्रतिभा डेअरी आर्थिक डबघाईला आल्याने सद्या प्रशासक आहे,शासनाची सबसिडी जमा आहे,तरीही पैसे शेतकऱ्यांना नाहीत.सत्तेतील चेअरमन व अन्य लोकांनी प्रयत्न केले नाही.डेअरी या विभागातील उमेदवार असेल त्यांनी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे द्यावेत.शिक्षण संस्थेला १४ कोटी दिले अन्य संस्थेला द्याल का?पणनमध्ये उभे राहण्याऱ्या व्यक्तीने किती संस्थेला कर्ज दिले?किती लोकांना कर्जे दिली.शेती दाखवून बिल्डर लॉबीला कर्ज दिले,अनेक कर्जे कमिशन घेऊन दिली.अनेक कर्जे थकीत आहेत,त्याची माहिती जिल्हा बँकेने द्यावी.जुन्या कॉग्रेस मधून शिवसेना व भाजप आता लढत आहे,त्याच्या कडून बँक लुटली जाणार आहे,अशी भिती परशुराम उपरकर यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शासकीय ठेवी बाहेर काढल्यास काय होईल ,हे पाहावे.सीडी रेशो कुठे जाईल हे पहा.जिल्हा बँक व जिल्ह्यातील संस्थाबद्दल स्वतःचा विकास न करता निवडणूक लढवायची असेल,त्यांनी राजकीय विरहित पॅनल करावं,मनसे त्यांना मदत करेल.सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्यानंतर बँक चांगल्या पद्धतीने उभी करायची असेल तर हाच एकमेव पर्याय आहे,असेही परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
