लोरे येथील दोन लाभार्थ्यांना घरदुरूस्ती अनुदान योजनेतंर्गत धनादेशाचे वाटप

*⚡कणकवली ता.१७-:* भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रा.पं.लोरे येथे पं.स.कणकवली सेस 20 टक्के फंडातून मागासवर्गीयांना घर दुरूस्ती अनुदान देणे या योजनेतील मंजूर दोन लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने लोरे प्रभागातील अत्यंत गरजू एकनाथ पेडणेकर व मंगेश पेडणेकर या दोन पात्र लाभार्थीना याचा लाभ देण्यात आला . यावेळी पं.स कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांचे हस्ते पात्र लाभार्थीना र.रू .20,000 / – चे धनादेशाचे वाटप करण्यात आले . सदर कार्यक्रमास लोरे सरंपच अजय रावराणे , उपसरपंच सौ. रोहिणी रावराणे , माजी सरपंच सुमन गुरव , माजी उपसरंपच अनंत रावराणे , भाजप लोरे शक्तीकेंद्र प्रमुख नरेश गुरव , ग्रामसेवक श्री.कदम हे उपस्थीत होते . मागासवर्गीय व अत्यंत गरजू व गरीब व्यक्तींना घर दुरूस्तीचा लाभ दिल्यामुळे लोरे प्रभागातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

You cannot copy content of this page