स्वयं रोजगार निर्माण करणाऱ्या युवकांचा गुलाबपुष्प देऊन किरण टेंबुलकर यांनी केला सन्मान

*⚡देवगड ता.१७-:* केंद्र सरकार ने २कोटी बेरोजगारांना रोजगार देणार असे आश्वासन दिले असताना देशात कंपन्यांचे खाजगीकरण,कोरोनाचे संकट यात निमार्ण झालेली बेकारी असे असताना कित्येक तरुणांचे बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकारला अपयश आले आहे. त्यातही कित्येक तरुणांनी स्वतःच्या रोजीरोटीकरिता स्वयं रोजगार निर्मिती केली अशा तरुणांचा १७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील स्वयंरोजगार निर्माण केलेल्या युवकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत देवगड युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज घाडी,तेजस मांडवकर,गौरव कदम,गणेश कांबळे,दीपक पाडावे, सिद्धांत कांबळे देवगड काँग्रेस अध्यक्ष उल्हास मणचेकर,सदस्य धनंजय सारंग ,सतीश पुरळकर,रितेश सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page