सावंतवाडी लायन्स क्लबच्यावतीने राष्ट्रीय अभियंता दीन साजरा

*⚡सावंतवाडी ता.१७-:* भारतरत्न महान भारतीय अभियंता कै. कोक्षगुंडम विश्वेश्वराय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला राष्ट्रीय अभियंता दीन सावंतवाडी लायन्स क्लबच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी अभियंता दादा खोर्जवेकर, पारळे, महेश गोंधळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन लायन क्लबचे अध्यक्ष ला. ऍड. परिमल नाईक यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी लायन झेड. सी. ला. अशोक देसाई, सचिव ला. अमेय पई, खजिनदार ला. प्रसाद राऊत, उपाध्यक्ष ला. विद्याधर तावडे, ला. गजानन नाईक, ला. बाळ बोर्डेकर, ला प्रा. टकेकर सर, ला. रवी सावंत, ला. रोहित नाडकर्णी आदी लायन सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष ला. अँड परिमल नाईक यांनी अभियंता दिनाचे महत्व विषद करून सर्व अभियंत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कारमूर्ती अभियंता दादा खोर्जवेकर, पारळे व महेश गोंधळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार सचिव ला. अमेय पई यानी मानले.

You cannot copy content of this page