सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरावर त्याचे होतेय अभिनंदन
*⚡वेंगुर्ले ता.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वजराट गावच सुपुत्र अनिकेत वजराटकर यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत वैद्यकिय क्षेत्रात महत्वाची मानली जाणारी मास्टर ऑफ सर्जनची पदवी प्राप्त केली आहे. आज बुधवारी जाहिर जाहिर झालेल्या निकालानुसार या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम श्रेणी उत्तीर्ण होण्याचा मान डॉ. अनिकेत वजराटकर यांचे एम. एस. सर्जरी या विषयात यश प्राप्त मिळवलेला आहे. डॉ. अनिकेत वजराटकर याचे प्राथमिक शिक्षण कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे झालेले होते. त्याशिवाय एम.बी.बी.एस. पदवी मुंबईच्या जेजे हॉस्पीटल मधून प्रथम श्रेणी मध्ये प्राप्त केली होती. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ. पांडुरंग उर्फ पी.डी. वजराटकर मुलगा असून त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये कौतुक होत आहे. डॉ. अनिकेत वजराटकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गला मास्टर ऑफ सर्जन डॉक्टर प्राप्त झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाने तो सिंधुदुर्गसाठी मिळवून द्यावा. अशीही मागणी जिल्ह्यातील जनतेतून होत आहे. दरम्यान, या यशानंतर भविष्यात काय करणार असे डॉ. अनिकेत वजराटकर यांना विचारले असता त्यांनी न्यूरो सर्जरी या विषयात सुपर स्पेशालिटी मिळविण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
