मालवण दि प्रतिनिधी गणरायाचा जयघोष करत, बेंजोच्या तालावर आणि फटाक्यांची आतषबाजी करत आज मालवणात सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी किनाऱ्यासह इतर विसर्जन स्थळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्तांची लगबग दिसून आली. गेले सात दिवस श्री गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज मालवणात सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत, सवाद्य मिरवणूक काढत आणि फटाक्यांची आतषबाजी करत गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवत विसर्जनाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवून होते. मालवण बंदर जेटी, दांडी किनारा, धुरीवाडा, देऊळवाडा, आडारी आदी विविध विसर्जन स्थळी गणेश भक्तांनी गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती.
गणरायाचा जयघोषात सात दिवसांच्या गणरायाचे मालवण येथे विसर्जन
