फोंडाघाट बावीचेभाटले ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत केला प्रवेश

*⚡कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन फोंडाघाट बावीचेभाटले येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्यासाठी ग्रामस्थ व अन्य पक्षातील कार्यकर्ते इच्छुक असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश चालु असताना सिंधुदुर्ग देखील कुठे मागे नाही याचे उदाहरण कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बावीचे भाटले येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले असून भव्य पक्षप्रवेश झाल्याने मनसेला फोंडाघाट विभागात तसेच कणकवली तालुक्यात बळकटी आली आहे.या वेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, नंदू घाडी ,संपर्क अध्यक्ष निलेश मेस्त्री, सहसंपर्क अध्यक्ष मनोहर घाडीगावकर, सत्यवान घाडीगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page