*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली शिवाजी नगर येथील विहिरीत एका वृद्धाने उडी घेत आत्महत्या केली.अनंत जयराम साळवी( वय ७१ )असे या वृद्धांचे नाव आहे.अंनत साळवी हे बुधवारी रात्री १ वा च्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले.मात्र काही वेळा नंतरही घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता पहाटे ४ वा.सुमारास त्यांचा मृतदेह घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामाना केला.त्यानंतर मृतदेह शवविच्छेदानासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. साळवी यांच्या आत्महत्यांचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.त्यांच्या पश्चात पत्नी,२ विवाहित मुली,मुलगा,सून,नातवंडे, असा परिवार आहे.
कणकवली शिवाजीनगर येथे वृद्धाची आत्महत्या
