आ शिवेंद्रसिंहराजे भोसलेसह संचालक सहभागी;अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले स्वागत
ओरोस ता १५ सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाविषयी माहिती घेणेसाठी बुधवारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सातारा चे संचालक मंडळ व अधिकारी यांनी भेट दिली. सातारा बँक अध्यक्ष आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष सुनिल गुलाबराव माने, संचालक दत्तात्रय नारायण ढमाळ, राजेंद्र निवृत्ती राजपुरे, नितीन लक्ष्मणराव जाधव (पाटील), शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर (खर्डेकर), राजेश विलासराव पाटील (वाठारकर), अनिल शिवाजीराव देसाई, प्रकाश ज्ञानू बडेकर, प्रदिप विधाते, अर्जुनराव रामचंद्र खाडे, कांचन सतिश साळुखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र नानासाहेब सरकाळे आदी सहभागी होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संचालक विकास सावंत, ऍड अविनाश माणगावकर, प्रकाश गवस, व्हिक्टर डॉन्ट्स, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई व बँकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी माहिती जाणून घेतली. सिंधुदुर्ग बँकेने विकसित केलेली अत्याधुनिक टेक्नॉलॉजी याबाबत सुद्धा माहिती घेतली.
