विशाल परब यांनी केली होती मागणी;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रयत्न
*⚡कुडाळ ता.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेकिंज कंपनी यावी अशी मागणी भाजप युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, वेंकिज कंपनीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता ही कंपनी माणगाव खोऱ्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती भाजप युवा नेते विशाल परब यांनी दिली आहे. ही कंपनी जिल्ह्यात यावी यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे सह माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना अखेर आज यश आले आहे. या कंपनीमुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार प्राप्त होणार आहेत. यावेळी विशाल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
