…..मीच नोंदविणार माझा पीक पेराचा देवगडवासीयांनी लाभ घ्यावा

उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारुती कांबळे यांचे आवाहन

*⚡देवगड ता.१५-:* महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या. अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद त्यावर प्रत्येक खातेदाराने करावी, असे आवाहन देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील , देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांनी केले आहे. शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही योजना असून प्ले स्टोअरवरून हा ऍप डाउनलोड करून घेत त्यात खातेदारांनी आपली माहिती द्यायची असून त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी देण्यात येणार आहे. या ओटीपीचा समावेश केल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या शेताच्या पीकपेऱ्याची माहिती नोंद केल्यानंतर फोटोसह माहिती या ऍपवर डाउनलोड करायची आहे. जेवढी पिके असतील तेवढी माहिती या ऍपवर भरता येणार आहे. आपल्या तालुक्यात पिकाचा प्रकार निवडताना आता निर्भेळ पीक निवडायचे आहे. त्यानंतर या पूर्ण झाल्यावर माहिती अपलोड करायची आहे. त्यानंतर तलाठी याला मंजुरी देणार आहेत. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यासह तालुक्यातील सर्वच खातेदारांनी या ऍपद्वारे नोंदणी करावी असे आवाहन ही देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,तहसीलदार मारुती कांबळे यांनी केले आहे..

You cannot copy content of this page