खासकिलवाडा येथे एका दुकानात चोरी;४० हजाराचे अंदाजे सामान चोरीस
*⚡सावंतवाडी ता.१५-:* कणकवली शहरात दुकान फोडीचे घटना ताजी असतानाच सावंतवाडीत खासकिलवाडा येथे एका दुकानात चोरी झाली आहे. यामध्ये अंदाजे ४० हजारहून जास्तचे सामान चोरीस गेले आहे. याबाबतची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस बाबू तेली करत आहेत.
