मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे मालवणात गणेशदर्शन

उपरकर यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संचारले नवचैतन्य

*⚡मालवण ता.१३-:* गणेशोत्सवाच्या निमित्ताने मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज सोमवारी मालवण तालुक्याचा दौरा करत विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत त्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. उपरकर यांच्या या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज देवबाग-तारकर्ली, हडी, मालवण शहर, गोळवण, कट्टा गुरामवाड येथे मनसे कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तसेच कार्यकर्त्यांशी संवादही साधला. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर,प्रतिक कुबल,निखिल गावडे, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page