माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा” योजनेचा नांदगावात मार्गदर्शन

*⚡कणकवली ता.१३-:* महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या. अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद शेतकऱ्यांनी करावी यासाठी त्यांच्या शेती बांधावर जात कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी नांदगाव पावाचीवाडी येथे मार्गदर्शन केले आहे. ऑगस्टपासून ही योजना शासना मार्फत सुरू करण्यात आली आहे. प्ले स्टोअरवरून हा ऍप डाउनलोड करून घेत त्यात खातेदाराच्या आपली माहिती द्यायची आहे. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी देण्यात येणार आहे. या ओटीपीचा समावेश केल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या शेताच्या पीकपेऱ्याची माहिती नोंद केल्यानंतर फोटोसह माहिती या ऍपवर डाउनलोड करायची आहे. जेवढी पिके असतील तेवढी माहिती या ऍपवर भरता येणार आहे. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यासह तालुक्यातील सर्वच खातेदारांनी या ऍपद्वारे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या सोबत तहसीलदार आर.जे.पवार, नांदगाव मंडळ अधिकारी जाधव , नांदगाव प्रभारी तलाठी लुडबे,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव उपसरपंच निरज मोरये,भाई मोरजकर, राजू खोत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page