चिपी विमानतळास बँ.नाथ पै यांचे तर उपकेंद्रास दंडवते यांची नावे देण्याचा प्रस्ताव स्वागतार्ह

कोविआने केली होती मागणी:मोहन केळुसकर

*⚡कणकवली ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळास संसदपटू बँ. नाथ पै यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देणार असल्याचे घोषित केले आहे. बँ. पै यांच्याबद्दल कोकणवासियांसह देशभरातील जनतेमध्ये आजही आत्मियता आहे. त्यामुळे या नावाला कोणाचाही विरोध असणार नाही. आम्ही या प्रस्तावाचे स्वागत करीत आहोत, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापिठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रास संसदपटू प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याच्या खा. विनायक राऊत यांच्या प्रस्तावाचे कोकणवासियांकडून स्वागत होत असल्याचे केळुसकर म्हणाले. बँ. नाथ पैचे सिंधुदुर्ग जिल्हात उचित स्मारक होण्याच्या द्दुष्टीने चिपी विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी आम्ही प्रसार माध्यमाद्वारे सर्वप्रथम केली होती. या मागणीची दखल उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली. ही स्वागतार्ह बाब आहे, असे सांगून खा. राऊत यांनी प्रा. दंडवते यांचे नाव उपकेंद्रास देण्याबाबतच्या प्रस्तावामुळे विरोधकही अशा उत्तुंग व्यक्तिमत्वांची आजही आठवण ठेवतात हे अधोरेखित होते.

You cannot copy content of this page