सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गणपतींचे घेतले दर्शन
*⚡सावंतवाडी ता.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब यांनी आपल्या सावंतवाडी विधानसभा गणपती दर्शन दौऱ्यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गणपतींचे दर्शन घेतले.या दौऱ्यात धीरज परब यांनी दोडामार्ग तालुका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भेट घेतली. तसेच मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांच्या घरी गणपती दर्शन घेतले. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावामध्येही त्यांनी दौरा करत गणपती दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेत आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या दौऱ्यामध्ये सावंतवाडी तालुका संपर्कअध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, उपतालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, मळेवाड विभागाध्यक्ष मंदार नाईक, मळगाव शाखा अध्यक्ष राकेश परब, आरोंदा विभाग अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, लॉटरी सेना तालुकाअध्यक्ष राजेश मामलेदार, धाकोरा शाखाअध्यक्ष निलेश मुळीक, इन्सुली शाखाअध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, सिद्धांत बांदेकर, शेर्ले महिला शाखाध्यक्ष नेहा मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज परब हे वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर असून पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांच्या घरी श्रींचे दर्शन घेण्याकरिता जाणार आहे
