सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा

मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन एअर बेड आणि दोन नेब्यूलायझर दिले भेट

मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मालवण ग्रामीण रुग्णालयाला दोन एअर बेड, दोन नेब्युलायझर भेट दिले. तसेच रुग्णांसाठी फळांचे वाटपही केले. मालवणच्या सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत असणाऱ्या अमेय देसाई यांनी कोरोना महामारी काळातही कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत आवश्यक साहित्याचे वाटप केले होते. तसेच रक्तदान कार्यातही अमेय देसाई यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. आज आपला वाढदिवस देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रम राबवीत साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाला दोन एअर बेड, दोन नेब्युलायझर भेट देत ते वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. समाजात वावरताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेतून आपण नेहमी काम केले असून रुग्णलायची गरज लक्षात घेऊन हे साहित्य भेट दिले आहे, यापुढेही आपले समाजकार्य सुरूच राहील असे यावेळी अमेय देसाई यांनी सांगितले. अमेय देसाई यांनी रुग्णालयाला आवश्यक साहित्य देत केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. बालाजी पाटील यांनी त्यांचे आभार मानले. तसेच देसाई यांनी दिलेल्या एअर बेडचा पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी उपयोग होणार असून नेब्युलायझर चा उपयोग रुग्णांना वाफ घेण्यासाठी होणार आहे असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही अमेय देसाई यांच्या कार्याचे कौतुक केले. रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर, नगरसेवक मंदार केणी, राजा शंकरदास, उत्तम पेडणेकर, उमेश हडीकर, महेंद्र पारकर, राजू कोवळे, वैभव मेस्त्री, दर्शन गावकर, तुषार मेस्त्री, विद्याधर मेस्त्री, विघ्नेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page