नातेवाईकांनी दिली वैभववाडी पोलीस स्थानकात खबर
*⚡वैभववाडी ता.११-:* कुसुर पिंपळवाडी येथील सखाराम गोपाळ नामये (वय ७८) हे वृद्ध गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. ४ सप्टेंबर रोजी ते घरातून निघून गेले. नातेवाईकांनी सगळीकडे त्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठेही सापडून आले नाहीत. अखेर आज ते बेपत्ता असल्याची खबर नातेवाईकांनी वैभववाडी पोलीस स्थानकात दिली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
