गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर गेला दुमदुमून
*⚡सावंतवाडी ता.११-:* सावंतवाडी शहरातील दीड दिवसीय गणपतींचे आज येथील मोती तलावात थाटात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.सावंतवाडी शहरातील दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात विसर्जनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांची गणपती विसर्जना वेळची गैरसोय लक्षात घेता नगराध्यक्ष संजू परब यांनी मोती तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी बोटी उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर च्या नामघोषात उशिरापर्यंत हे विसर्जन चालू होते. तालुक्यातील गावागावातील दीड दिवसीय गणपतींचेही आज विसर्जन करण्यात आले.
