अँड. राघवेंद्र नार्वेकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी*
*⚡सावंतवाडी ता.०८-:* गणेश उत्सव काळात संपूर्ण शहरात तसेच नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी कॉग्रेस शहर अध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी अँड संभाजी सावंत, जास्मिन लक्ष्मेश्वर, महेश चितारी, समीर भाट आदी उपस्थित होते.
या निवेदनात अॅड. राघवेंद्र नार्वेकर यांनी म्हटले आहे की, शुक्रवारपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण असल्याने मुंबई तसेच अन्य ठिकाणाहून येणारे चाकरमानी, कुटुंबातील मंडळी यामुळे घराघरात माणसांची आवक वाढणार आहे. यासाठी गणेशोत्सव काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणे शहरवासियांसाठी आवश्यक आहे. यावर्षी मे पासूनच पावसास सुरुवात झाली तसेच अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. तरी सुदधा सद्यस्थितीत सावंतवाडी नगरपरिषदेकडून ठरावीक वेळेतच पाणी सोडले जात असल्याने आधीच येथील नागरिक त्रस्त आहेत, तसेच सणासुदीच्या काळात ठराविक वेळेत पाणी सोडल्यास नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहे. तरी नागरिकांच्या सेवेसाठी संपूर्ण गणेशोत्सव काळात शहर व नागरिकांच्या अखत्यारित येणाऱ्या भागामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात यावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे
