कुरंगवणे वरचीगोसावीवाडी येथे नळपाईप लाईन कामाचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.०८-:* कणकवली तालुक्यातील कुरंगावणे या गावातील वरची गोसावीवाडी येथे नळ पाईप लाईन कामाचा शुभारंभ नुकताच जि प स्थायी समितीचे अध्यक्ष व माजी बांधकाम वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला कुरंगावणे गावच्या सरपंच सरिता पवार,उपसरपंच पप्पू ब्रम्हदंडे, तंटामुक्ती अध्यक्ष बबलू पवार, ग्रामपंचायत सदस्या रेणुका पवार, प्रतिभा गोसावी तसेच सनाजीक कार्यकर्ते रवींद्र लाड,सुनील भारती,यशवंत भारती, बळीराम गोसावी,चेतन पाटील, चंदन चाळके,बाळकृष्ण गोसावी,दिपक गोसावी आदी मान्यवर ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. कुरंगावणे ग्रामपंचयत अंतर्गत शसनाच्या १५ वित्त आयोगातून या नळ पाईप लाइन च्या भूमिपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून सुमारे ६०,००० /- एवढि अंदाजे रक्कम या कामावर खर्च करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

You cannot copy content of this page