सुकांत वरूनकर यांची सामाजिक बांधिलकी
*⚡कणकवली ता.०८-:* कोकणात येणाऱ्या विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूनकर यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील खारेपाटण चेकपोस्ट येथील मोफत चहा व पाणी वाटपाचा शुभारंभ कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याहस्ते फित कापुन करण्यात आला. या कार्यक्रमाला जि. प. अध्यक्षा संजना सावंत,माजी सभापती दिलीप तळेकर,पं स सदस्य तृप्ती मळवदे,खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, रफिक नाईक,संकेत शेट्ये,महेश कोळसुलकर,खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख उद्धव साबळे , पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते,आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल होणार असल्याने या गणेश भक्ताचे मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूनकर मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करून मोफत चहा व पाणी बॉटल चे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. तर सुकांत वरूनकर यांच्या सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उपक्रमाचे कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
