आंबा काजू पीक विमा योजनेचा विमा बागायतदारांना त्वरित मिळावा

कॉग्रेस नेते नंदकुमार घाटे यांची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

देवगड (प्रतिनिधी) आंबा काजू पीक विमा योजनेचा विमा बागायतदारांना त्वरित मिळावा .अशी मागणी देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार घाटे यानी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचेकडे केली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे देवगड तालुक्यामधील सन २०२०-२१ मध्ये येथील बागायतदारांनी आंबा व काजूचा विमा उतरविला होता. अवकाळी पाऊस,कमी जास्त्‍ तापमान,गारपीट,चक्रीवादळ या निकषावरती संरक्षण मिळण्यासाठी फळपीकविमा उतरविला जातो. मात्र यावर्षी १४ मे रोजी प्रचंड प्रमाणात वादळी वारा होवून आंब्याचे नुकसान झाले होते. यामुळे या विम्याचा लाभ शेतक-यांना मिळणे महत्वाचे आहे. ३१ मे नंतर ४५ दिवसाच्या आत ही फळ पीकविम्याची रक्कम शेतक-यांच्या खात्यामध्ये जमा होणे आवश्यक असते मात्र सप्टेंबर महिना सुरु होवून देखील अदयापही इन्शुरन्स कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत तरी आंबा पीकविमा योजनेचा लाभ तात्काळ येथील बागायतदरांना मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी सरचिटणीस शरद शिंदे,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर,उदय रुमडे,रवी चांदोस्कर,तात्या वाळके,जयराम कदम उपस्थित होते. फोटॊ-.देवगड उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करताना नंदकुमार घाटे व अन्य

You cannot copy content of this page