मोंड साईनगर येथून १४ हजार रूपयांचा गोवा बनावटीचा मुद्देमाल जप्त

देवगड तालुक्यातील मोंड साईनगर येथे स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीचा १४ हजार १००/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .सदरची कारवाई मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास करण्यात आली याबाबत रवी मनोहर इंगळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी हिरकांत परशुराम जोशी र.मोंड साईनगर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(इ) नुसार कारवाई करण्यात आली . हस्तगत केलेल्या मुद्देमाल ४५००/- रु किमतीच्या १८० मिली ४५ बाटल्या, तसेच लेमन व्होडका १८०मिली ४८ बाटल्या रक्कम ४८००/;,व हनिगाईड ब्रॅण्डिं १८० मिली ४८ बाटल्या रक्कम रु ४८००/; असा आहे . ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस.एम.शेळके,एएस आय आर बी शेळके,पोलीस नाईक केसरकर हेड कॉन्स्टेबल कोयंडे यांनी केली .अधिक तपास पोलीस नाईक प्रशांत जाधव करीत आहेत.

You cannot copy content of this page