बेपत्ता नम्रता शिंदे मृतदेह मिळाला

तिर्लोट आंबेरी खादीपात्रात आला आढळून

वैभववाडी प्रतिनिधी नापणे जैतापकरवाडी येथील नम्रता नरेंद्र शिंदे वय ४० या बेपत्ता विवाहीत महीलेचा मृतदेह विजयदुर्ग खाडीत तिर्लोट आंबेरी येथील पुलाखाली मंगळवारी सकाळी १०.वाजण्याच्या सुमारास सापडला आहे.मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत नम्रता शिंदे ही ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी कोणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाली होती.याबाबत तिचे पती नरेंद्र धोंडू शिंदे यांनी वैभववाडी पोलिसात तक्रार दिली आहे.त्यानुसार ती मानसिक रुग्ण होती.यापूर्वीही अनेक वेळा घरात कोणाला काही न सांगता माहेरी निघून जायची.तशीच ती गावतच असलेल्या नापणे कोकाटेवाडी येथील माहेरी गेली असेल म्हणून नातेवाईकांनी तिथे चौकशी केली.माञ ती माहेरी गेलेली नाही.इतर नातेवाईकांकडे चौकशी करुनही ती कुठेच सापडली नाही.त्यामुळे पतीने सोमवारी पत्नी नापत्ताची खबर वैभववाडी पोलिसांत दिली होती.तालुक्यात दोन तीन दिवस जोरदार पाऊस पडत आहे.घराशेजारी नदी असल्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता विचारात घेऊन ग्रामस्थ व नातेवाईकांनी दोन दिवस नदीपाञात शोध घेतला.तर नदीपाञात शोध मोहीम राबविण्यासाठी मालवण येथील स्कूबा ड्रायव्हर पथक बोलविण्याची विनंती तहसिलदार रामदास झळके यांच्याकडे पञाद्वारे केली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग खाडीत तिर्लोट आंबेरी पुलाखाली स्थानिक ग्रामस्थांना अनोळखी महीलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी विजयदुर्ग पोलिसांना माहीती दिली.नापणे येथून महीला बेपत्ता असलेची वैभववाडी पोलिसांत असलेले नोंदीवरुन वैभववाडी पोलिसांना माहीती देण्यात आली.वैभववाडी पोलिसांनी याबाबत तिच्या कुटुंबीयांना माहीती दिली.त्यानुसार नातेवाईकांनी देवगड येथे जाऊन मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ग्रामीण रुग्णालय देवगड येथे शवविच्छदन करुन मंगळवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.तिच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page