उपसभापती राजू परुळेकर यांचा आरोप
मालवण, दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या ग्रामस्थांची मातीची भिंत व नळ्यांची घरे होती अशा सुमारे ३३४५ ग्रामस्थांचा नवीन घरासाठी सर्वे करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात यात शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून अनेकांना डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप मालवण पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी पंचायत समितीच्या आढावा सभेत केला. ग्रामीण भागात झालेल्या सर्वेनुसार सर्व लाभार्थ्यांना घरे मिळवून देत त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. शासनाच्या नवीन घरासाठी ड यादी बनविण्यासाठी ग्रामीण भागात सर्वे करण्यात आला. यात ३३४५ लाभार्थ्यांची यादी बनवून ती शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आली. यात केवळ १६१७ पात्र लाभार्थ्यांची यादी पाठविण्यात आली आहे. प्रत्यक्षात ज्या ग्रामस्थांची मातीची भिंत आणि नळ्यांची घरे आहेत अशाच ग्रामस्थ लाभार्थ्यांचा सर्वे करण्यात आला होता. मात्र पात्र यादी पाहिल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आज अनेक ग्रामस्थांची घरे मोडकळीस आली असून त्यांच्या निवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात झालेल्या सर्वेनुसार सर्व लाभार्थ्यांना नवीन घरे मिळायलाच हवी अशी भूमिका श्री. परुळेकर यांनी यावेळी मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामीण भागात झालेल्या ड यादीच्या सर्वेनुसार जी अत्यावश्यक घरे बांधणे आवश्यक आहेत. अशा लाभार्थ्यांना जर वगळले असेल तर संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेत अशा लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीस सादर करावी ही यादी मंजूरीसाठी शासनाकडे पाठविली जाईल असे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी यावेळी
