देवबाग उपसरपंच पदी मोरेश्वर धुरी यांची बिनविरोध निवड

मालवण, दि प्रतिनिधी देवबाग ग्रामपंचायतीचे उपसरपंच तमास फर्नांडिस यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी आज देवबाग ग्रामपंचायतीच्या सभेत निवड प्रकिया पार पडून श्री. मोरेश्वर धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी खोबरेकर यांच्या अध्यक्षते खाली आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शाखाप्रमुख रमेश कद्रेकर यांनी नूतन उपसरपंच धुरी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सरपंच सौ. खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया केळुसकर, निहिता गावकर, फिलसू फर्नांडीस, श्रद्धा मालंडकर, ग्रामसेवक पी. टी. पेडणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page