तेजस डोंगरिकर, सुनील नेवरेकर यांचा पुढाकार
वैभववाडी प्रतिनिधी कोवीड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी उंबर्डे ग्रामपंचायती मार्फत फवारणी,सेनिटायजर वाटप, मास्क वाटप, कोवीड प्रबोधन,ऑक्सिजन बेड,उपकेंद्र बळकटी करण, प्रा.आ.केंद्राला विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. याच वेळी श्री.तेजस राजेंद्र डोंगरीकर व श्री.सुनील यशवंत नेवरेकर यांच्या सहकार्याने रिलायन्स फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ३००० मास्क मा. तहसीलदार श्री.झळके साहेब, बी.जे.पी. तालुका अध्यक्ष श्री.नासिर काझी उंबर्डे गावचे सरपंच श्री.एस.एम.बोबडे, उपसरपंच श्री.दशरथ दळवी, डॉ.करणसिंह पाटील, डॉ. कांबळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. कोवीड-१९ च्या काळामध्ये श्री.सुनील नेवरेकर यांच्या मार्फत उंबर्डे ग्रामपंचायतीला यापूवी ही २५ पी.पी.ई.किट्स ही देण्यात आले होते. उंबर्डे ग्रामपंचायती मार्फत रिलायन्स फाउंडेशन, श्री.तेजस राजेंद्र डोंगरीकर व श्री.सुनील यशवंत नेवरेकर यांचे आभार मानण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला सदानंद दळवी,,आबा दळवी, अनिल पाटील, श्रीपत धामणकर, नामदेव नेवरेकर, रफिक बोबडे, विजय केळकर, विजय दळवी, रत्नकांत बंदरकर, उमर रमदुल, धर्मरक्षित जाधव, किशोर दळवी, अस्लम पाटणकर, शहाबुद्दीन नाचरे आदी उपस्थित होते.
