चिवला बीच येथे माड पडून किचन शेडचे नुकसान

नौका देवगड बंदरात आश्रयाला

मालवण दि प्रतिनिधी गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आजही आपली हजेरी कायम ठेवली तर प्रादेशिक हवामान विभागाने अतिमूसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिल्यानंतर मालवणातील नौकांनी देवगड येथिल बंदरात आश्रय घेतला आहे मंगळवारी रात्रौ मुसळधार पावसामुळे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे चिवला बीच येथील अनंत मारुती मयेकर यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या किचन शेडवर माड पडल्याने किचन शेड जमीनदोस्त झाली. गेले तीन चार दिवस वादळी वारे आणि पाऊस यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्राला तुफान आले असून सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मालवण शहर आणि तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारे आणि पाऊस यामुळे काही ठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे

You cannot copy content of this page