१५ सप्टेंबर पासून जनावरांसाठी लाळ खुरकूत लसीकरण

*⚡ओरोस ता.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ सप्टेंबर पासून लाळ खुरकूत लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार गाय म्हैस जनावरांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना ही लस देवून जनावरे संबधित आजारापासून संरक्षित करावीत असे आवाहन जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी यांनी केले आहे.           लाळ खुरकत या आजारामुळे तोंड व खुरात जखमा होतात. त्यामुळे जनावर चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते. जनावर चालताना लंगडते. ताप येतो. जनावरांमध्ये थकवा निर्माण होऊन कोणतेही काम करू शकत नाही. ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडते. प्रामुख्याने लाळ खुरकत रोग प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या तसेच बैल या जनावरांमध्ये आढळतो. रोगाचे निर्मूलन करण्यासाठी तसेच नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळ खुरकत लसीकरण मोहीम सुरू करतात आली आहे. ही मोहीम जिल्हा परिषद पशुसंवर्धन व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि आपली जनावरे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षित करून घ्यावीत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी यांनी केले आहे. 

You cannot copy content of this page