जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांची खोचक टीका
*⚡दोडामार्ग ता.०६-:* दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्था आता सोसावेना झालीय. हा रस्ता म्हणजे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या निर्लज्यापणाचा कळस बनला आहे. बेजबाबदार लोकप्रतिनिधीनींनी यंदा दोडामार्ग तालुक्यात गणेश दर्शनाला येण्याची लाज वाटते असे जाहीर करावे. तसेच कृपया जोपर्यंत रस्ता सुधारत नाही तोपर्यंत तालुक्यात येऊ नये. तुमच्या घोषणा ऐकताना आता जनतेला लाज वाटते, अशी खोचक टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला तरी बांदा – दोडामार्ग रस्त्याची आणखीनच दुरावस्था झाली आहे. बांदा ते सासोली दरम्यान अनेक ठिकाणी वाहन चालवणे शक्य होतं नाहीय, यावरून श्री. नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीका केली आहे. ते म्हणाले ‘ चतुर्थी पूर्वी रस्त्याची किमान दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती. आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक आंदोलन केली. मात्र त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून सत्तधारी पाहतात. पालकमंत्री,आमदार, खासदार आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या कार्यकर्ते, पुढारी यांना या रस्त्यावरून ये -जा करताना लाज देखील वाटतं नाही. यावरून यांच्या निर्लज्जपणाने कुठली पातळी गाठली आहे याचा विचार आता जनतेने करावा. बांदा ते सांसोली दरम्यान काही अशी ठिकाणं आहेत की तेथून दुचाकीस्वार डबलशीट जाऊ शकत नाही. खड्ड्यामुळे तर जनतेची हाड खिळखीली होतआहेत. गणपतीच्या मूर्ती येथून कशा आणाव्यात हा भाविकासमोरचा प्रश्न आहे. चारचाकी वाहनाना एवढे धक्के बसत आहेत की वाहने नादुरुस्त होतं आहेत. आधीच आर्थिक परिस्थितीने बेजार झालेल्या जनतेला निदान शासनाने रस्त्यावरून चालणे तरी सुखकर ठेवायला हवे होते. आमदार प्रशासनाला दोष देऊन मोकळे होतात. गेल्यावर्षी या रस्त्याची दुरावस्था होती. मधल्या काळात आमदार, पालकमंत्री काय झोपा काढत होते काय? की त्यांना स्वतःची जबाबदारी काय वाटतं नाही? रस्त्यामुळे जनता त्रस्त आहे. प्रशासन मात्र टुकार उपाययोजना करून जनतेला मूर्ख बनवत आहेत. लोकप्रतिनिधीनो तुमच्याकडे थोडीफार लाज शिल्लक असेल तर तरी तालुक्यात गणेशदर्शनाला तरी येऊ नका. जे लोकप्रतिनिधी दोन तालुके जोडणारा व वर्दळ असलेला राज्यमार्ग काही वर्षे सुधारू शकत नाहीत तर त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून पात्रता तरी काय? असा प्रश्न आता जनतेला पडत आहे. इच्छाच नाही तर मार्ग काय दिसणार त्यांना. या मार्गांवररती काही मीटर लांबीचे भाग चालण्यालायक नाहीत. आमदार, पालकमंत्री व अधिकाऱ्यांना जनतेची काळजी वाटली असती तर त् पाऊस असतानाही त्याची दुरुस्ती होऊ शकली असती. या भागात रस्त्याचे काँक्रेटिकारण करणे शक्य होते. मात्र संवेदना हरवलेल्या आमदार व प्रशासनाला हे उपाय तरी कसे सुचणार?
