पारंपरिक मच्छीमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार:विजय केनवडेकर
*⚡मालवण ता.०६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात स्वतंत्र मच्छिमार खाते निर्माण करून १५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल पारंपरिक मच्छीमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, याची माहिती भाजपचे प्रभारी मालवण शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली. केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच जन आशीर्वाद यात्रा केली. यावेळी पारंपरिक मच्छिमारांनी त्यांची भेट घेऊन केंद्र सरकार प्रति कृतज्ञता म्हणून ना. राणे यांचा सत्कार केला. यावेळी पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी मच्छिमारांची स्वतंत्र बैठक घेऊन केंद्रीयस्तरावर हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही ना. राणे यांनी दिली. यावेळी नारायण धुरी, भाऊ मोरजे, संदिप मालंडकर, वसंत गावकर, प्रसाद सरकारे, सौ. पराडकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक गणेश कुशे, दिपक पाटकर आदी उपस्थित होते.
