शॉर्टसर्किटमुळे राहत्या घराला आग

घराचे नुकसान: जनावरे होरपळली पाळये येथील घटना

*⚡दोडामार्ग ता.०६सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील एका बाजूला असलेल्या पाळये गावातील धनगरवाडी येथील शेतकरी गंगाराम घाघू वरक यांच्या राहात्या घराला लागून असलेल्या गोठा युक्त पडवीला पहाटे दोन वाजता विधुत शॉटसर्किट होऊन लागलेल्या आगीमुळे संपूर्ण पडवी गोठा जळून गेला यात बांधण्यात आलेल्या तीन दुभत्या जनावरांना डावे बांधलेले असल्याने बाहेर पडणे शक्य झाले नाही त्यामुळे लागलेल्या आगीत तीन जनावरे होरपळून गंभीर जखमी झाली. गावातील ग्रामस्थ यांनी वेळीच धावपळ करून पाणी मारा करत घराचा भाग वाचवला. पाळये धनगरवाडी येथील शेतकरी गंगाराम वाघू वरक यांनी घराच्या बाजूला असलेल्या पडवीत जनावरे बांधली होती. हे कुटुंब राञी झोपी गेले माञ दोन वाजता त्याना गुरे धडपडत मोठ मोठ्याने हंबरत असल्याचा आवाज आला म्हणून ते दरवाजा उघडून बाहेर तर पडवी पेटत आहे. तर गुरे जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. हे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करून इतरांना बोलावून घेतले वाडीतील ग्रामस्थ यांनी पाणी आणून आग विझवली व गुरांना भाजलेल्या अवस्थेत कशी बशी बाहेर काढली तर ही गुरे पन्नास ते साठ टक्के भाजली आहेत.

You cannot copy content of this page