जिल्हा परिषदेने स्वतः मूल्यमापन करून शिक्षक पुरस्कार द्यावे

सेनेचे प सदस्य प्रदीप नारकर यांची मागणी

ओरोस-यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार देताना गेल्यावर्षी ज्या शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले होते त्यातील दोन शिक्षकांना पुरस्कार दिल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कारासाठी अपात्र असलेल्या शिक्षकांनी यावर्षी असे विशेष कोणते कार्य केले त्यामुळे गेल्यावर्षी अपात्र शिक्षक पात्र झाले आहेत हा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणासारख्या पवित्र व जिल्हयातील मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे संशयास्पद परिस्थिती निर्माण होणे जिल्हयाच्या शैक्षणिक विकासासाठी अयोग्य आहे. शेक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अनेक शिक्षक चांगल्याप्रकारे काम करत आहेत, तसेच प्रसिद्धीपासूनही दूर असतात. अशा पुरस्कार निवड पद्धतीमुळे त्या शिक्षकांवर अन्याय होऊन ते पुरस्कारापासुन वंचित राहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने स्वत: आपल्या सर्व शिक्षकांचे मूल्यमापन करून पुरस्कार देणे आवश्यक आहे, असे सेनेचे जिखा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सिंधुदूर्ग जिल्हयामध्ये बहुसंख्येने असलेला आपला शेतकरी बांधव व त्यांचा प्रमुख व्यवसाय असलेला आपला जिल्हयातील शेती उद्योग यासाठी मार्गदर्शक ठरणारे कृषी व पशुपक्षी प्रदर्शन या जिल्हा परिषदेला गेली तीन वर्षे करता आले नाही. राज्य शासनाकडून जिल्हयातील विकास कामांसाठी मिळणारा निधी ही जिल्हा परिषद खर्च करू शकत नाही. त्यामुळे गेली तीन वर्षे सातत्याने हा विकास निधी अखर्चित राहिल्यामुळे शासनास परत करावा लागत आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद अधिनियमाची पायमल्ली करून विकास निधी चुकीच्या पद्धतीने वाटप केला जात आहे तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान. कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केलेला आहे. शिक्षण विभागामध्ये एल. ई. डी टिव्ही खरेदी प्रकरण, वॉटर प्युरिफायर खरेदी गैरव्यवहार व आता या शिक्षक पुरस्कारांमध्ये गेल्यावर्षी अपात्र ठरलेले शिक्षक यावर्षी पात्र हे सर्व संशयास्पद आहे त्यामुळे सर्वच स्तरावर ही जिल्हा परिषद विफल ठरताना दिसत आहे, असे प्रदीप नारकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page