*⚡सावंतवाडी ता.०५-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने आज सावंतवाडी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.शिक्षक दिनाचे औचित्य साधून यावर्षी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव नं 1 चे शिक्षक श्री. नितीन सावंत यांचा क्लबचे अध्यक्ष ला.अँड. परिमल नाईक यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तसेच प्रोफेसर ला. टिकेकर सर यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम लिखित विचारवेध पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सचिव ला.श्री. अमेय पई, उपाध्यक्ष ला. विद्याधर तावडे, खजिनदार ला. प्रसाद परब, झेड. सी. ला. अशोक देसाई, ला. संतोष चोडणकर, ला. बाळ बोर्डेकर, ला. रवींद्र स्वार आदी लायन सदस्य उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी वतीने शिक्षक दिन साजरा
