धनगर महासंघ प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकरे यांची माहिती
*⚡मालवण ता.०५-:* महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या धनगर समाजातील गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक मदत करतानाच त्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने धनगर समाज महासंघ प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाला समाजातील मुला मुलींनी साथ द्यावी असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकरे यांनी येथे बोलताना केले. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुंभारमाठ धनगरवाडा, कातवड धनगरवाडी, देवली धनगरवाडी, असरोंडी धनगरवाडा, कुडाळ तालुक्यातील गोठोस धनगरवाडा गावराई धनगरवाडा, यादोनही तालुक्यातील एकुण १६५ विद्यार्थ्यांना ऑल इडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण काकडे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना प्रविण काकडे यांनी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ने गेल्या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केल्यानंतर यावर्षीही सुमारे ३ हजार धनगर समाजातील तसेच इतर समाजातील विद्यार्थ्यांना मदत केल्याचे सांगितले यावेळी नवलराज काळे, कोकण प्रदेश अध्यक्ष अमोल जंगले, जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग नवनाथ झोरे, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष बापू वरक, कुडाळ तालुकाध्यक्ष मंगेश झोरे, मालवण तालुकाध्यक्ष दिपक खरात, अध्यक्ष मतदारसंघ सोमनाथ झोरे, उपाध्यक्ष निकेश झोरे, हेमंत फाले, विकास शिदे, रोहित वरक, ओमकार डोईफोडे, जाऊ जंगले, संदेश वरक, संदेश कोकरे, बाबुराव कोकरे, अमोल कोकरे, सागर कोकरे आदी समाज बांधव उपस्थित होते.
