मालवण दि प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान व्यक्त करत मालवण मध्ये युवक काँग्रेसच्या वतीने जेष्ठ शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रवक्ते तथा कुडाळ काँग्रेस निरीक्षक अरविंद मॉडकर, माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, हर्षदा पाटील, पल्लवी तारी, माजी शिक्षक विनायक कोळंबकर, रमेश आचरेकर, श्रीकृष्ण नातू, दिलीप नार्वेकर, रंजन तांबे, अभय शेर्लेकर, दीपक जाधव, शिक्षिका प्रभावती वाडकर, जयश्री हडकर, मिनल सारंग, मिनल वस्त, रश्मी आचरेकर, शोभा माडये, सुप्रिया बांदेकर, हेमा परुळेकर, शोभना नातू, फिलोमीना पंडित, अदिती शेर्लेकर, देवानंद लुडबे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दर्शनिक शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होत असताना आम्ही देखील आपला गुरुजनांचा सत्कार करणं आपलं भाग्य समजतो, अशा भावना व्यक्त केल्या तर पल्लवी तारी यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते असे सांगून त्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी सौ. नीलम करंगुटकर यांनी आभार मानले
युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार
