भाजीपाला,फळे, फुले व्यापारी संघटना कणकवली अध्यक्षपदी दादा पावसकर

स्थानिक विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार

*⚡कणकवली ता.०५-:* कणकवली शहरात व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला, फळ, फुले विक्रेत्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी कणकवलीत फुल विक्रेते दादा पावसकर यांची तर उपाध्यक्षपदी कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तसेच संघटनेच्या कार्याध्यक्षपदी अनिल हळदीवे व खजिनदारपदी यशवंत गावडे यांची निवड करण्यात आली. कणकवली तालुक्यातील स्थानिक भाजीपाला, फळे, फुले विक्रेत्यांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी व यातून स्थानिक विक्रेत्यांना कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून जागा व्यवसायासाठी उपलब्ध व्हावी याकरिता कणकवली शहरात भाजी, फळे, फुले विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांना नगरपंचायत च्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही संघटना स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या माध्यमातून फ्लाय ओव्हर ब्रिज खाली स्थानिक विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल नगरपंचायत व नगराध्यक्ष यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या संघटनेच्या वतीने उर्वरित कार्यकारणी सदस्य यांचाही संघटनेत समावेश करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यातील स्थानिक विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सर्व विक्रेत्याला एकाच छताखाली आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

You cannot copy content of this page