राष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू रौप्य पदक विजेता जयेश परब यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

*⚡वेंगुर्ले ता.०५-:* राष्ट्रीय खेळाडू जयेश राजन परब याचे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड होऊन राजस्थान येथे 30,31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी च्या वतीने पुष्पगुच्छ व शाल घालून सन्मान करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. या सत्कार प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना ऊर्फ बाळू देसाई , भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेविका शीतल आंगचेकर , परबवाडा सरपंच पपू परब, ग्रामपंचायत सदस्य व युवमोर्चा जिल्हा चिटणीस हेमंत गावडे , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , तालुका चिटणीस समीर चिंदरकर, किसान मोर्चा चे बाळू प्रभू , पुंडलिक हळदणकर , नामदेव सरमळकर , सत्यवान परब , गौरेश वायंगणकर , आकाश साळकर , निखिल गावडे , प्रथमेश गावडे , कौस्तुभ वायंगणकर , संतोष परब, कृष्णा हळदणकर आदी उपस्थित होते .

You cannot copy content of this page