*⚡वेंगुर्ले ता.०४-:* वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील रहिवासी आणि वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयातील डॉ. महादेव विजय कोळंबकर (वय 38) यांचे आज शनिवार चार सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. गेली दहा वर्षे डॉ. कोळंबकर वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. सुरुवातीला त्यांनी शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आपल्या सेवेला सुरुवात केली. त्या नंतर ते सद्या वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत होते. रुग्णांना त्यांच्या कडून नेहमी चागली सेवा मिळत असे.
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. महादेव कोळंबकर यांचे निधन
