Headlines

गणेशोत्सव काळात बाजारात चार चाकींना बंदी

कडेकोट पोलीस बंदोबस्त;पोलीस निरीक्षक कोरे यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.०४-:* गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारात होणारी वाहनांची कोंडी टाळण्यासाठी बाजारात 4 चाकी वाहनांना बंदी तसेच ६ तारीखपासून शहरात पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा कडक बंदोबस्त सुरू करण्यात येणार आहे तर जादा फोर्स देखील मागवण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली तर गणेशचतुर्थी कालावधीत घर बंद ठेऊन गावी जाणाऱ्या नागरिकांनी घरात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले येथील पोलीस ठाण्याच्या सभागृहात आज गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या सदस्यांची कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत बैठक पार पडली यावेळी रवींद्र मडगावकर, प्रकाश राऊळ, सुधीर धुमे, विजय कासार, योगेश सुराणा, रियाज शेख, आगोस्तीन फर्नांडिस, सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे व्यापारी संघांच्या वतीने व पंचायत समिती माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

You cannot copy content of this page