*नवीन होतकरू चेहऱ्यांना संधी देऊन नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर;युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची माहिती
*⚡कुडाळ ता.०५-:* सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नवीन होतकरू चेहऱ्यांना संधी देऊन नवीन कार्यकारणी मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे, आशी माहिती युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी दिली. सिंधूदूर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. तत्पूर्वी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख तसेच बेसिक पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक पक्ष निरीक्षक डॉ. चाळके या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी या कार्यकारिणी बरखास्ती बाबत निर्णय घेतला. गणेश चतुर्थीनंतर नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करताना नवीन आणि होतकरू चेहर्यांना संधी देऊन सक्षम तसेच प्रत्येक तालुक्यात निरीक्षक नेमुन बैठक घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील बेसिक सह सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांची निवड करून युवक जिल्हा कार्यकारीणी जाहीर करणार असल्याचे सांगितले. गणेश चतुर्थीनंतर जिल्हा युवक पक्ष निरीक्षक डॉ. चाळके सिंधूदूर्ग जिल्ह्यात आल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवक वर्गाचा चांगला प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असून. राष्ट्रवादी काँग्रेसकडे युवक मोठ्या प्रमाणात आकर्षिक होत आहेत. युवक जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर लगेचच सिंधूदूर्ग जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख.₹, युवक पक्ष निरीक्षक डॉक्टर चाळके यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सहकार्याने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून. राष्ट्रवादी युवक संघटना मजबुत करण्यासाठी तसेच तरुण वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्ह्यातील युवकांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे प्रफुल्ल सुद्रिक यांनी स्पष्ट केले.
