राष्ट्रवादीतर्फे मागणी
*⚡वेंगुर्ला ता.०३-:* गणेश चतुर्थी कालावधीत वेंगुर्ला तालुक्यातील विद्युत पुरवठा 24 तास अखंडपणे सुरु ठेऊन गणेशभक्तांना सहकार्य करावे अशी मागणी वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता खटावकर यांची भेट घेऊन केली. यावेळी जिल्हा सदस्य नितीन कुबल, डॉक्टर सेवादलचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजिव लिंगवत, शहर उपाध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्नील रावळ, सुहास जाधव आदी उपस्थित होते.
