सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तालुक्यात आज ८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात खासकीलवाडा १, माठेवाडा ३, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात नेमळे १, वेत्ये १, मळगाव १ असे रुग्ण सापडले असून सद्य स्थितीत तालुक्यात ९८ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page